स्पेशल रिपोर्ट : नागपूर : गाडीच्या टपावर बसून वाघाचं बेकायदेशीर 'फोटोसेशन'

02 Dec 2017 09:12 PM

उमरेड अभयारण्यात वाघाचं चित्रकरण करणारी व्यक्ती अभयारण्यातील हंगामी कर्मचारी असल्याचं समोर आलं आहे. विपीन तलमले असं त्याचं नाव असून ‘माझा’च्या बातमीनंतर कर्मचाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.

विपीन तलमले वाघ बघण्यासाठी थेट जीपच्या टपावर चढला होता. यावेळी वाघ त्याच्या समोर येऊन उभा ठाकला. विशेष म्हणजे वाघ जीपच्या मागच्या बाजूला होता. त्यामुळे ड्रायव्हरला त्याचा अंदाजही नव्हता.

यानंतर ड्रायव्हरनं पार्किंग लाईट्स लावल्यामुळे वाघाचं लक्ष थोडं विचलित झालं. मात्र कर्मचाऱ्याचं नशीब बलवत्तर म्हणून वाघ तिथून शांतपणे निघून गेला. अन्यथा हे धाडस कर्मचाऱ्याच्या जीवावरही बेतू शकलं असतं.

LATEST VIDEOS

LiveTV