नागपूर : 1 कोटींसाठी अपहरण झालेल्या लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांची हत्या

23 Nov 2017 12:09 PM

खंडणीसाठी अपहरण झालेल्या लॉटरी व्यापाऱ्याची हत्या झाल्याचा संशय आहे. बुटीबोरी पोलिस स्टेशनअंतर्गत पेटीचुहा शिवारात एक जळालेला मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह राहुल आग्रेकर यांचा असण्याची शक्यता वर्तवला जात आहे.

मात्र, हा मृतदेह राहुल आग्रेकर यांचा नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. ज्या बोलेरो जीपमध्ये अपहरणकर्ते राहुल आग्रेकरांना घेऊन गेले होते, ती गाडी नागपूर-कामटी मार्गावर सापडली आहे. परंतु आरोपी मात्र अजूनही पसार आहेत.

व्यापारी राहुल आग्रेकर (वय 34 वर्षे) यांचं एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं. आग्रेकर यांच्या दोन मित्रांवर पोलिसांना संशय आहे, जे गायब आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV