नागपूर: अतिक्रमणाची तक्रार करणं तरुणीला महागात

16 Nov 2017 12:57 PM

नागपुरात अतिक्रमणाची तक्रार करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलंय. महापालिकेकडे अतिक्रमणाची तक्रार केल्य़ानं तिला आणि तिच्या कुटुंबियांना परसरातील गावगुंडांकडून धमक्या दिल्या जातात. सक्करदरा परिसरात रहाणाऱ्या अमिता जयस्वालनं तिच्या परिसरातील एका अतिक्रमणाची तक्रार महापालिकेकडं केली होती. तक्रारीची शहनिशा केल्यानंतर महापालिकेने ते अतिक्रमण काढले...मात्र यानंतर अमिता जयस्वाल आणि तिच्या कुटुंबियांना परिसरातील काही गावगुंडांनी जगणं मुश्कील करुन टाकलंय.

LATEST VIDEOS

LiveTV