नागपूर : 10 रुपयात पोटभर जेवण, शासकीय रुग्णालयात 'दीनदयाळ थाळी' सुरु

16 Dec 2017 08:51 PM

नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आजपासून दीनदयाळ थाळी मिळायला सुरुवात झाली. या उप्रक्रमांतर्गत रुग्णांच्या नातेवाईकांना अवघ्या १० रुपयात दर्जेदार आणि पोटभर जेवण दिले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत दीनदयाळ थाळीचे लोकार्पण करण्यात आले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीत सुरु करण्यात आलेल्या या विशेष योजनेचा लाभ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात येणाऱ्या हजारो लोकांना होणार आहे. विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फवडवीस आणि नितीन गडकरी यांनीही या विशेष सवलतीच्या थाळीचा आस्वाद घेतला.   

LATEST VIDEOS

LiveTV