नागपूर : भाजप नेता मुन्ना यादवच्या दोन्ही मुलांचं आत्मसमर्पण

30 Dec 2017 08:42 PM

मारहाण आणि हत्या प्रकरणात फरार असलेला भाजप नेता मुन्ना यादव याची मुलं पोलिसात शरण आली आहेत. करण यादव आणि अर्जुन यादव यांनी धंतोली पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आहे.

21 ऑक्टोबर रोजी झालेल्या हत्येच्या प्रयत्नातील आरोपी असलेला मुन्ना यादव आणि त्याचे कुटुंबीय फरार आहेत. मुन्नाच्या मुलांनी आत्मसमर्पण केलं असलं, तरी अद्याप मुन्ना आणि त्याचा भाऊ फरार आहेत.

नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी मुन्ना यादव प्रकरणात सरकारला चांगलंच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. मुन्ना यादव नागपूरजवळच एका फार्म हाऊसवर लपला असल्याचा दावाही विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता.

LATEST VIDEOS

LiveTV