नागपूर : पायाचं ऑपरेशन, वाढदिवस बाजूला ठेऊन शरद पवार हल्लाबोल मोर्चात सहभागी होणार

12 Dec 2017 12:24 PM

पायाच्या अंगठ्याचं ऑपरेशन आणि प्रकृतीच्या अस्वास्थ्याकडे लक्ष न देता शरद पवार जन आक्रोश हल्लाबोल आंदोलनात सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा धनवटे कॉलेजपासून सुरु होईल. तर काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा दीक्षाभूमीवरुन निघेल. लोकमत चौकाजवळ हे दोन्ही मोर्चे एकत्र येतील. आणि शरद पवारांच्या नेतृत्वात विधीमंडळाकडे कूच करतील. आज पवारांचा 77 वा वाढदिवस आहे. मात्र राज्यातला शेतकरी हालअपेष्टा सहन करतोय, अशावेळी वाढदिवस साजरा करणं योग्य नसल्याचं म्हणत पवार मोर्चात सहभागी झालेत.

LATEST VIDEOS

LiveTV