712 नागपूर : बोंडअळीग्रस्त, धान उत्पादक आणि ओखीग्रस्त शेतकऱ्यांना मदत : पांडुरंग फुंडकर

24 Dec 2017 10:45 AM

बोंडअळीग्रस्त, धान उत्पादक आणि ओखीग्रस्त शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय. विधानसभेत कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांनी या शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केलीये. या भात उत्पादन शेतकऱ्यांना ३३ टक्क्याहून जास्त नुकसान झालं असल्यास प्रति हेक्टरी ६ हजार ८०० ते २३ हजार २५० रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना तिहेरी मदत जाहीर करण्यात आलीये. यात एनडीआरएफ, पीक विमा आणि बीटी कंपन्यांकडुन मदत दिली जाणारेय. तर ओखीग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफ आणि पीक विमा अशी दुहेरी मदत जाहिर करण्यात आलीये.

LATEST VIDEOS

LiveTV