नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचा जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा आज विधानभवनावर धडकणार

12 Dec 2017 10:24 AM

सकाळच्या गुलाबी थंडीत नागपूरचं वातावरण चांगलच तापणार आहे. कारण सरकारला जाब विचारण्यासाठी विरोधकांचा जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा आज विधानभवनावर धडकणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे नेते गुलाम नवी आझाद या मोर्चाचं नेतृत्त्व करणार आहेत. त्यामुळं आजचा दिवस राजकीय घडामोडींनी तापलेला पाहायला मिळेल. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी विरोधकांनी चांगलीच कंबर कसली. त्यात काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडलं. या पार्श्वभूमीवर आज काय घ़डामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV