नागपूर : हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांची पत्रकार परिषद, भाजपवर सडकून टीका

10 Dec 2017 10:54 PM

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनला उद्यापासून (11 डिसेंबर) सुरूवात होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. हिवाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारवर सडकून टीका केली.

नागपूरचा फरार गुंड मुन्ना यादव हा मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा मोबाईल तपासला तर नागपुरतला फरार गुंड मुन्ना यादवचा शोध लागेल, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला.

ओबीसी शिष्यवृत्ती आघाडी सरकारच्या काळात 550 कोटी होती, ती या सरकारने 50 कोटींवर आणल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला.

LATEST VIDEOS

LiveTV