नागपूर : चक्काजाम आंदोलनावेळी राष्ट्रवादीचे आमदार बजोरिया महिला पोलिसाच्या अंगावर धावले

11 Dec 2017 06:51 PM

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनानंतर आज नागपुरात खासदार सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन सुरु केलं. मात्र यावेळी आंदोलकांना महिला पोलिस  ताब्यात घेत असताना राष्ट्रवादीचे आमदार  महिला पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याचं दिसलं. संदीप बजोरिया असं या आमदारांचं पूर्ण नाव असून ते यवतमाळमधले राष्ट्रवादीचे आमदार आहेत. हल्लाबोल आंदोलन नागपुरात दाखल होताच आधी वर्धा रस्त्यावरच्या विमानतळाजवळ सुळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम केला.

LATEST VIDEOS

LiveTV