नागपूर: पोलिसांच्या जेवणाची आजही वानवा, तासभर पोलीस रांगेत

12 Dec 2017 03:36 PM

हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर विधीमंडळाबाहेर तैनात असलेल्या पोलिसांच्या जेवणाची आजही वानवा होताना दिसतेय... विधानभवनाच्या मुख्य दाराशी बख्त बुलंद शाह पुतळ्य़ाशेजारी मागील 40 मिनिटांपासून पोलिस कर्मचारी आणि अधिकारी हातात जेवणाचं कूपन घेऊन उभे आहेत मात्र स्टॉलवरील जेवण संपलंय...
काल एबीपी माझानं पोलिसांच्या जेवणासंबंधी बातमी दाखवल्यानंतर गृहखात्याला जाग आली होती... पोलिसांसाठी तयार करण्यात आलेल्या 9 पदार्थांच्या मेनूऐवजी पोलिसांना फक्त वरण भातच देण्यात आला होता.... त्यामुळे नागपूर पोलिस आयुक्तांनी केटररचे सचिन मिश्रा यांची तात्काळ हकालपट्टी केली होती... पण आज कुठे पोलिसांना व्यवस्थित जेवण मिळेल अशी आशा वाटत असतानाच कामावर असणाऱ्या पोलिसांची जेवणासाठी वानवा होताना दिसतेय...

LATEST VIDEOS

LiveTV