नागपूर : हिवाळी अधिवेशनात नेते तुपाशी, पोलिस उपाशी, पोलिसांच्या जेवणातील पदार्थ गायब

11 Dec 2017 10:12 PM

नेते तुपाशी, पोलीस उपाशी अशीच परिस्थिती नागपुरात पाहायला मिळाली. राज्याच्या हिवाळी अधिवेशन काळात कायदा- सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांना अर्धवट आणि निकृष्ट जेवण देण्यात आलं.

पोलिसांच्या ताटात 9 पदार्थांचे आश्वासन असताना फक्त 2 पदार्थच पोलिसांना देण्यात आले. हे दोन पदार्थ म्हणजे फक्त वरण आणि भातावर बोळवण करण्यात आली.

चपाती, 2 भाज्या, सलाड, मिठाई, लोणचे, पापड यापैकी एकही पदार्थ पोलिसांना मिळाला नाही.

LATEST VIDEOS

LiveTV