नागपूर: मुन्ना यादव दिसले तर पोलिसांना कळवा

03 Nov 2017 01:57 PM

राज्य सरकारमध्ये बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष असलेले मुन्ना यादव तुम्हाला कुठे दिसेल तर नक्की पोलिसांना कळवा.
कारण नागपूर पोलिसांना सध्या मन्ना यादव आणि त्याचे सहकारी सापडत नाहीत.
ऐन दिवाळीमध्ये अजनी परिसरात भाजप नेते मुन्ना यादव आणि मंगल यादव यांच्या कार्यकर्त्यात तुंबळ हाणामारी झाली होती. लाठ्या काठ्या, लोखंडी रॉड्स आणि तलवारीने एकमेकांवर जीवघेणे हल्ले करण्यात आले होते. त्यामध्ये दोन्ही गटातील १० लोकं गंभीर जखमी झालेत. पोलिसांनी दोन्ही गटांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्न सारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद केलीय.
मात्र नागपूर पोलिसांना मुन्ना यादव काही सापडत नाही.

LATEST VIDEOS

LiveTV