नागपूर : 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

30 Dec 2017 08:39 PM

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी १ हजार अधिकारी तैनात करण्यात आलेत. तसंच गेल्या वर्षी ज्यांना ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह अंतर्गत पकडण्यात आलं होतं, त्यांना यावर्षीही नोटीस पाठवण्यात आली आहे. शिवाय ब्रेथ अॅनालायझरही खरेदी करण्यात आलेत. त्यामुळे नियमांचा भंग करणाऱ्यांना यंदा मद्यपान करून ड्राईव्ह करणं चांगलंच महागात पडणार आहे.
दरम्यान 31 डिसेंबरच्या संध्याकाळपासून 1 जानेवारीच्या सकाळपर्यंत शहरातील सर्व उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV