नागपूर : अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांची उपासमार सुरुच

12 Dec 2017 10:18 PM


हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांची दुसऱ्या दिवशीही उपासमार सुरूच आहे. आज दुपारच्या जेवणासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना खूप वेळ ताटकळत उभं रहावं लागलं. विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोलीस कर्मचारी जेवणाचं कुपन घेऊन तासभर उभे होते. मात्र वेळेत त्यांच्यापर्यंत जेवण न पोहोचल्यानं उपाशी पोटीच त्यांना माघारी परतावं लागलं. दरम्यान काल बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पूर्ण जेवणाऐवजी फक्त वरण भात देण्यात आलं होतं. पोलिसांची ही अडचण एबीपी माझानं बातमीच्या रुपात दाखवल्यानंतर, संबंधित कॅटरर्सची हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र आज पुन्हा येरे माझ्या मागल्याचाच प्रकार पाहायला मिळालाय.

LATEST VIDEOS

LiveTV