नागपूर : कुटुंबीयांनीच सुपारी देऊन प्राचार्य मोरेश्वर वानखेडेंना संपवलं

04 Nov 2017 12:09 PM

प्राचार्य मोरेश्वर वानखेडे यांच्या हत्येचा 24 तासात उलगडा झाला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे कुटुंबातील लोकांनीच सुपारी देऊन हत्या केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. कौटुंबिक वादातून पत्नी अनिता वानखेडे यांनी सुपारी देऊन पतीची हत्या घडवून आणल्याची बाब तपासातून पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी वानखेडे यांची पत्नी अनिता, विवाहित मुलगी सायली आणि मुलीचा मित्र शुभम सहारे अशा तिघांना अटक केली आहे. काल नागपूरमध्ये तलवारीचे वार करुन वानखेडेची हत्या करण्यात आली.

LATEST VIDEOS

LiveTV