नागपूर : मुन्ना यादव नागपुरातील फार्म हाऊसवरच, विखे-पाटलांचा गौप्यस्फोट

22 Dec 2017 08:27 PM

नागपूर पोलिसांना हवा असलेला हत्येच्या प्रयत्नातील आरोपी मुन्ना यादव नागपूर पासून २२ किलोमीटर अंतरावरील एका फार्महाऊसवर दडून बसल्याचा गौप्यस्फोट विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (शुक्रवार) सभागृहात केला.

राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर बोलताना त्यांनी ही माहिती सभागृहाला दिली. ते म्हणाले की, ‘मुन्ना यादवचा नागपूर पोलीस रात्रंदिवस शोध घेत आहेत. तो सापडत नसल्याचे सांगितलं जात आहे. परंतु, हा मुन्ना यादव आजही नागपूरपासून २२ किलोमीटर अंतरावरील एका फार्म हाऊसमध्ये दडून बसला आहे.’

LATEST VIDEOS

LiveTV