नागपूर : भाजप खासदार नाना पटोले उद्धव ठाकरेंची भेट घेणार

26 Oct 2017 08:36 PM

भाजप खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपविरोधातच दंड थोपटले आहेत. येत्या 15 तारखेला भाजपमधल्या सर्व नाराज नेत्यांची मोट बांधून पुण्यात संमेलन घेणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी एबीपी माझाला दिली आहे.

नाना पटोले उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. शिवाय ते काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेणार आहेत. 10 दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करणारं पत्र मोदींना लिहिलं होतं. पण त्यानंतरही कोणताही प्रतिसाद न आल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचं पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV