नागपूर : व्हॉट्सअॅप ग्रुपमधून तस्करांचीच पोलिसांवर हायटेक पाळत

09 Nov 2017 09:09 PM

सरकारी अधिकारी आणि त्यांच्या यंत्रणेकडून तस्कर आणि अवैध कारभार करणाऱ्यावर नजर ठेवली जाते, अशी अनेक प्रकरणं आपण ऐकली आहेत. मात्र जर तस्करच सरकारी अधिकाऱ्यांवर, त्यांच्या कार्यालयांवर पाळत ठेवून अवैध धंदे चालवत असतील तर काय म्हणणार! नागपूर जिल्ह्यात सध्या तस्करांनी अशाच पद्धतीने चार विभागांच्या अधिकाऱ्यांवर करडी नजर ठेवली आहे. तस्करांच्या या हायटेक हेरगिरीचे एक्स्क्लुझिव्ह पुरावे 'एबीपी माझा'च्या हाती लागले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV