नागपूर : पेट्रोलपंपचालकांना वाचवण्यासाठी कोट्यवधींची वसुली, मुख्यमंत्र्यांना निनावी पत्र

12 Dec 2017 12:06 AM


ठाणे क्राईम ब्रांचकडून नागपुरात पेट्रोलपंप चालकांसोबत सेटलमेंट करण्यात आली आहे. यासाठी लाखो रुपयांची वसूली करण्यात आली आहे. असे आरोप करणारे निनावी पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक सतीश माथूर यांना अज्ञाताने पाठवले आहे.
या पत्रात जून, जुलै महिन्यात राज्यभर ठाणे क्रांईम ब्रँचने केलेल्या छापासत्रात नागपुरातील दोन मध्यस्थांच्या मार्फत कोट्यवधी रुपयांची वसुली केली आहे. पत्रात मध्यस्थतींची नावे गुरु आणि टिंकू अशी लिहिण्यात आलीत.
दरम्यान या संपुर्ण प्रकरणासंदर्भात नागपुरातील एक ही पंप चालक समोर येऊन बोलायला तयार झाला नाही.

LATEST VIDEOS

LiveTV