नागपूर : शेतकऱ्यांची काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी : व्यंकय्या नायडू

11 Nov 2017 10:33 PM

जनतेसाठी शेतकरी अन्नधान्य पिकवतात, त्यामुळे त्यांची काळजी घेणं ही सरकारचीच जबाबदारी आहे, असं म्हणत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सरकारचे कान टोचले.
काल नागपूरमध्ये अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली. या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. काल सुरु झालेले हे प्रदर्शन सोमवारपर्यंत चालेल. यात शेती बरोबरच शेतीतील नविन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली.

LATEST VIDEOS

LiveTV