नागपूर : अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भवाद्यांची वेगळ्या विदर्भासाठी बंदची हाक

11 Dec 2017 06:06 PM

हिवाळी अधिवेशनाची सुरूवात वादळी झाली असतानाच वेगळ्या विदर्भासाठी विदर्भवाद्यांनी बंदची हाक दिली.. या बंदचा परिणाम नागपूर आणि वर्धा शहरात काही प्रमाणात जाणवला.. नागपुरात काही ठिकाणी आंदोलकांनी एसटीवर दगडफेक केली तर काही ठिकाणी टायर पेटवून दिले.. तसंच वर्धा शहरातील हिंगणघाट समुद्रपूरमध्ये शाळा महाविद्यालयासोबतच बाजार पेठ बंद करण्यात आंदोलकांना यश आलं..
दरम्यान आंदोलकांच्या या भूमिकेमुळे विद्याविकास कॉलेज, झोटिंग कॉलेज अचानक बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला...

LATEST VIDEOS

LiveTV