नागपूर : धनगर आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील घोंगडी घेऊन अधिवेशनात

20 Dec 2017 02:48 PM

कर्जमाफी, बोंडअळीनंतर आज अधिवेशनाचं सकाळचं सत्र धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गाजलं.  राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील चक्क पिवळा फेटा, घोंगडी आणि काठी घेऊन अधिवेशनात पोहोचले. आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देण्याच्या आश्वासनाचं काय झालं, असा प्रश्न त्यांनी सरकारला केला. जयंत पाटलांनी आपलं म्हणणं मांडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि जयंत पाटील यांच्यात मिश्किल संवादही रंगला. जयंत पाटलांचं इतक्या लवकर हातात काठी घेण्याचं वय नाही, असा टोला हरिभाऊ बागडेंनी लगावला.  

LATEST VIDEOS

LiveTV