नागपूर : पोलीस उपाशी, राजकारणी तुपाशी, अधिवेशनात नेत्यांसाठी मेन्यू कोणता?

11 Dec 2017 10:03 PM

नागपुरात सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून पोलीस कर्मचारी उन, थंडी, वारा याची तमा न बाळगता बंदोबस्तात व्यस्त आहे.. मात्र याच पोलिसांची सरकारला किती काळजी आहे हे आज उघडकीस आलंय. हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी दुपारचं जेवण म्हणून फक्त वरण भात वाटण्यात आलं. खरं तर बंदोबस्तासाठी नागपुरात येणाऱ्या पोलिसांना चपाती, दोन प्रकारच्या भाज्या, वरण, भात,सलाद आणि एक गोड पदार्थ असा मेनू निश्चित करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात जेव्हा पोलिसांना जेवण वाढण्यात आलं तेव्हा मेनूमधले 7 पदार्थ गायब होते. काही पोलीस कर्मचारी एकाच ताटात जेवताना दिसत होते. त्यामुळं राज्य सरकार पोलिसांना उपाशी पोटी ड्यूटी करायला भाग पाडतंय का असा सवाल आता विचारला जातोय. 

LATEST VIDEOS

LiveTV