नागपूरमध्ये अग्नितांडव, दोन फॅक्टरी जळून खाक

28 Oct 2017 11:06 AM

नागपूरमध्ये लाकडाच्या फॅक्टरीला मोठी आग लागली आहे. कापसी गावातील नवीन नगरमध्ये ही दुर्घटना घडली आहे.

ही आग इतकी भीषण आहे की त्यात आतापर्यंत दोन फॅक्टरी जळून खाक झाल्या आहेत. योगेश पटेल आणि भगवान पटेल यांच्या फॅक्टरी आगीच्या भक्ष्यस्थानी आहेत.

आगीत दोन आरा मशीन यूनिट जळून खाक झाले आहेत. तिसऱ्या यूनिटमधील आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV