नालासोपारा : मौजमजेसाठी चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांच्या बेड्या, लाखोंचा ऐवज लंपास

01 Nov 2017 11:09 AM

केवळ मौजमस्तीसाठी पैसे मिळवण्याच्या उद्देशाने घरफोडी, सोनसाखळी चोरी, बाईक चोरी यांसारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीला नालासोपारा पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेली सर्व आरोपी 17 ते 26 या वयोगटातील असून यापैकी एक आरोपी अल्पवयीन आहे. नालासोपारा, वसई आणि मुंबईच्या काही भागांमध्ये ही टोळी सक्रीय होती. या टोळीतील काही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी पावणेतीन लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV