संजय लीला भन्साळींवर नानांचा निशाणा

23 Nov 2017 01:12 PM

संजय भन्साळी कशा प्रकारचे दिग्दर्शक आहेत, हे सगळ्यांना ठाऊक आहे, असं सांगतानाच आधी सिनेमा बघा त्यानंतर त्याचा विरोध करा, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं. गोव्यात सुरु असलेल्या इफ्फीच्या सोहळ्यात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

“संजय लीला भन्साळी कसे दिग्दर्शक आहेत, हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यांचा ‘बाजीराव मस्तानी’ बाकीच्यांना आवडला असेल, पण मला नाही. गरजेचं नाही की, ठप्पा लावलेले सर्वच सिनेमे आवडतील.”, अशा शब्दात नाना पाटेकर यांनी संजय लीला भन्साळींचा समाचार घेतला.

गोव्यात सुरु असलेल्या ‘इफ्फी’ सोहळ्यावेळी सिनेमाप्रेमींशी ते संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी संजय लीला भन्साळींसह अनेक मुद्द्यांवर मनमोकळा संवाद साधला.

LATEST VIDEOS

LiveTV