नांदेड : आजपासून नांदेड-अमृतसर विमानसेवा सुरु

23 Dec 2017 11:51 PM

नांदेड-अमृतसर ही विमानसेवाही आजपासून सुरु झालीये...आज दुपारी दीड वाजता अमृतसरहून 170 प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचं विमान नांदेडमध्ये दाखल झालं...यानंतर 2 वाजता नांदेडहून 52 प्रवाशांनी अमृतसरकडे भरारी घेतली...आठवड्यातून 2 दिवस ही विमानसेवा असेल...नांदेडमध्ये शिखांचे दहावे गुरु गोबिंदसिंघजींचं समाधी स्थळ आहे..त्यामुळे गुरुद्वाराच्या भेटीसाठी पंजाब-हरियाणाहून भाविकांची संख्या मोठी असते....याआधी नांदेड-हैद्राबाद आणि नांदेड-मुंबई विमानसेवा सुरु झालीये...

LiveTV