नांदेडचा निकाल : काँग्रेसला विराट यश, भाजपचा तीन वर्षात पहिला दारुण पराभव

Thursday, 12 October 2017 9:39 PM

भाजपच्या विजयाचा वारु रोखणाऱ्या अशोक चव्हाणांची राजकीय जादू नांदेडमध्ये पाहायला मिळाली आहे. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर झालेल्या जवळपास प्रत्येक महापालिका निवडणुकांत भाजपनं अभूतपूर्व यश मिळवलं. मात्र नांदेड महापालिकेत अगदी उलटं चित्र पाहायला मिळत आहे. अशोक चव्हाणांच्या काँग्रेसनं 81 पैकी 70 जागा जिंकल्यामुळे नांदेड महापालिकेत भाजपची अक्षरशः वाताहत झाली.अशोक चव्हाणांच्या हातून नांदेडचा गड हिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह भाजपचे प्रमुख नेते रिंगणात उतरले होते. मात्र नांदेडमध्ये भाजपला साधा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही

LATEST VIDEO