नांदेड महापालिकेत मतदान संपन्न, 60 टक्के मतदानाची नोंद

11 Oct 2017 11:03 PM

नांदेड महापालिकेत  60 टक्के मतदान झालंय. महापालिका स्थापन झाल्यापासून नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता असल्यानं अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली. यावेळी मात्र भाजपनं काँग्रेसला तगडं आव्हान उभं केलं. त्यामुळे अशोक चव्हाण आपला बालेकिल्ला राखून ठेवतात का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची मुदत 31 ऑक्टोबर 2017 रोजी संपणार आहे. एकूण 20 प्रभागांतील 81 जागांसाठी हे मतदान होतं आहे, त्यापैकी 41 जागा महिलांसाठी राखीव आहेत. उद्या याठिकाणची मतमोजणी होणार आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV