नाशिक : घराजवळ जाण्यासाठीचा रस्ता बनवण्यासाठी 20 वर्षे लढा

23 Nov 2017 11:21 PM

नाशिकमधल्या लहवी गावात राहणाऱ्या लष्करी जवान शिवाजी पाळदे यांच्या 20 वर्षाच्या लढ्याला अखेर यश आलं....पाळदेंना घराकडे जाण्यासाठी अर्धा किलोमीटरचा रस्ता हवा होता... ग्रामपंचायत, पंचायत समितीनं रस्ता मंजूरही केला... मात्र घराकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ राहणारे पोलीस कर्मचारी एकनाथ लोहकरे, दादा लोहकरे आणि खंडू मुठाळ यांनी खाजगी जागा असल्याचं सागंत रस्ता होऊ दिला नाही.. पाळदे कुटुंबानं न्यायालयात धावही घेतली...  न्यायालयाने हा रस्ता तत्काळ बांधून द्यावा अशी तंबीही दिली. मात्र तब्बल 15 वर्ष उलटले तरीही रस्ता काही होईनाच...अखेर 17 नोव्हेंबरला नाशिकचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, जिल्हा प्रशासनातले काही अधिकाऱ्यांकडे पाळदे यांनी विनवणी केली आणि अखेर पाळदे कुटुंबियांचा रस्त्याचा मार्ग मोकळा झाला...

LATEST VIDEOS

LiveTV