नाशिक : ऊसाच्या शेतात बिबट्याचे तीन बछडे, अनेकांची सेल्फीची हौस

09 Nov 2017 08:57 PM

नाशिक जिल्ह्यातल्या ब्राह्मणवाडे शिवारात ऊसाच्या शेतात बिबट्याचे 3 बछडे सापडले. ऊस तोडणी कामगारांना हे बछडे आढळून आले. बछडे सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच त्यांना बघण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली.
विशेष म्हणजे या छोट्या-छोट्या बछड्यांना हातात घेऊन अनेकांनी स्वतःची सेल्फीची हौसही भागवून घेतली. दरम्यान, बछडे सापडल्यानं त्यांची आईसुद्धा परिसरात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनविभागानं बिबट्याच्या मादीला पकडण्यासाठी बछड्यांना पिंजऱ्यात ठेवलं आहे

LATEST VIDEOS

LiveTV