नाशिक : रस्त्याच्या मधोमध झाडं, गेल्या 3 वर्षात अपघातांमध्ये 50 जणांचा मृत्यू

16 Oct 2017 10:54 PM

नाशिकमध्ये रस्त्याच्या रस्त्याच्या मध्ये असलेल्या झाडावर कार आदळून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिकरोड येथील शिखरेवाडीजवळ्या पासपोर्ट कार्यालयासमोर ही घटना घडली. रिपाइंच्या पदाधिकारी प्रीती भालेराव आपल्या कार्यकर्त्यांसह कारने जात होत्या. त्यावेळी बसला ओव्हरटेक करताना कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघात प्रीती भालेराव, पुजा भोसले आणि सुरज गिरजे यांचा जागीच मृत्यु झाला. तर निशांत बागुल आणि रितेश विश्वकर्मा या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, नाशिक शहरात रस्त्यांच्या मधोमध असलेल्या झाडांमुळं गेल्या 3 वर्षात 50 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे या  झाडांचा प्रश्न एकदा पुन्हा एेरणीवर आला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV