नाशिक : झाडावर कार आदळून पाच जणांचा मृत्यू

16 Oct 2017 06:12 PM

नाशिकमध्ये रस्त्याच्या रस्त्याच्या मध्ये असलेल्या झाडावर कार आदळून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. नाशिक रोड येथील शिखरेवाडीजवळ्या पासपोर्ट कार्यालयासमोर ही घटना घडली. रिपाइंच्या पदाधिकारी प्रीती भालेराव आपल्या कार्यकर्त्यांसह कारने जात होत्या. त्यावेळी बसला ओव्हरटेक करताना कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघात प्रिती भालेराव, पुजा भोसले आणि सुरज गिरजे यांचा जागीच मृत्यु झाला. तर निशांत बागुल आणि रितेश विश्वकर्मा या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी अपघातात 5 जणांचा मृत्यु झाल्याने नाशिकमधील रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडांचा प्रश्न एकदा पुन्हा एेरणीवर आला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV