नाशिक : सटाण्यात 7 जणांच्या टोळीचा दरोडा, लाखोंचा ऐवज लंपास, पती-पत्नी जखमी

30 Oct 2017 01:03 PM

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात सात जणांच्या टोळीनं दरोडा टाकला. या दरोड्यावेळी केवल देवचंद ख़ैरनार आणि त्यांची पत्नी शुशिलाबाई जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सटाण्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरोडेखोर त्यांच्या घरातील 20 तोळं सोनं आणि 3 लाख रूपये घेऊन पसार झाले.

LiveTV