नाशिक : मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईन फुटली, पुरवठा खंडीत

07 Dec 2017 03:09 PM

नाशिकमध्ये डिझेलची पाईपलाईन फुटल्यानं गेल्या नऊ तासपासून डिझेल पुरवठा ठप्प झाला आहे. मात्र ही पाईपलाईन चोरीच्या हेतूनं फोडण्यात आल्याचं आता समोर आलं आहे.

आज पहाटे निफाडपासून काही अंतरावर खानगावजवळ मुंबई-मनमाड डिझेल पाईपलाईन फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझेल गळती सुरु झाली. हे डिझेल शेतात आणि गोदावरीच्या नदीपात्रात पसरत असल्याची माहिती मिळते आहे.

LATEST VIDEOS

LiveTV