नोटाबंदी वर्षपूर्ती : राज्यभरातील विविध भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचं आंदोलन

08 Nov 2017 06:51 PM

मुंबई-पुण्याप्रमाणे सोलापूर, नाशिक, औरंगाबाद आणि जळगाव इथं नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त निषेध नोंदवला गेला.  तिकडे सोलापुरात काँग्रेसनं नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काळा दिवस साजरा आंदोलन केलं. तर भाजपनं भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून नोटाबंदीच्या समर्थनार्थ उत्सव साजरा केला. जळगावात काँग्रेस पक्षानं श्राद्ध घालून नोटाबंदीच्या निर्णयाला चुकीचं ठरवलं. तर औरंगाबादेत काँग्रेसनेच मुंडन करुन नोटाबंदीचा निषेध केला. नाशिकमध्येही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी रामकुंडावर नोटाबंदीचं श्राद्ध घातलं.

LATEST VIDEOS

LiveTV