नाशिक : तरुणीला संमोहित करुन भोंदू बाबाने 81 किलो सोनं, 29 लाख लुटले

28 Nov 2017 10:15 PM

युवतीला संमोहित करुन भोंदूबाबाने हडपलेलं घबाड डोळे फिरवणारं आहे. उदयराज पाडे उर्फ पांडेबाबानं एका युवतीला संमोहित करुन तिच्याकडून तब्बल 81 किलो सोनं, 1 किलो चांदी, 29 लाखाची रोकड, जोनपूरमधील अलिशान बंगला, दोन स्कॉर्पिओ, बुलेट आणि अजून बरंच काही हडप केलं. आपल्या भक्ताच्या मुलीला संमोहित करुन तिला आपल्याच नातेवाईकांच्या घरात चोरी करायला लावली आणि त्यातून या बाबानं एवढं घबाड उभं केलं.

LATEST VIDEOS

LiveTV