नाशिक : कार्टूनिस्ट कम्बाईन संघटनेकडून 'हास्य दिपावली'चं आयोजन

29 Oct 2017 01:00 PM

नाशिकमधल्या कुसुमाग्राज स्मारकात व्यंगचित्रांची अनोखी दुनिया अवतरली. कार्टुनिस्ट कम्बाईन संघटने कडून हास्य दिपावली हे तीन दिवसीय व्यंगचित्र प्रदर्शन भरवण्यात आलं. यात राजकारण, समाजकारणावर भाष्य करणारी, काहीशी टिपिकल, तर काही गंमतीदार संदेश देणारी व्यंगचित्र पाहण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. खेळाडू, अभिनेते, राजकीय नेत्यांची व्यंगचित्रेही आकर्षणाचा विषय ठरलीये. तीन दिवस चालणा-या या प्रदर्शनात नवोदित व्यंगचित्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातले नामांकित व्यंगचित्रकारांची व्याख्यानं आणि प्रात्यक्षिकंही ठेवण्यात आली.

LATEST VIDEOS

LiveTV