नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 17 वा दीक्षांत समारंभ

15 Nov 2017 10:18 PM


महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 17व्या दिक्षांत समारंभात नाशिकचीच छाप राहिली. नाशिकचा विद्यार्थी सुलतान मोईउद्दीन शौकत अली याने 9 विषयात तर मानसी मयुर गुजराथीने 7 विषयात सुवर्णपदकं पटकावत नाशिकचा झेंडा रोवला....
विद्यापीठाच्या शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत वैद्यकिय शिक्षण मंत्री तसंच कुलपती गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दिक्षांत सोहळा झाला. यावेळी विद्यापीठाच्या विविध वैद्यकीय शाखांमधील पदवी, पदव्युत्तर, पदवीका अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्या 74 गुणवत्ता प्राप्त स्नातकांना सुवर्णपदक आणि संशोधनासाठी 22 पीएचडी पदवी प्रदान करण्यात आल्या...

LATEST VIDEOS

LiveTV