नाशिक : मानवी तस्करी प्रकरणी 7 जणांवर पीटा कायद्यांतर्गत गुन्हा, दोन आरोपी अटकेत

14 Dec 2017 10:12 AM

एबीपी माझानं बांग्लादेशमधून वेश्याव्यवसायासाठी होणाऱ्या मानवी तस्करीचा पर्दाफाश केल्यानंतर नाशिक पोलिसांना जाग आली. त्यांनी पहाटे चार वाजेपर्यंत कारवाई करुन तीन जणांना अटक केलीय. तर 7 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
सोनू देशमुख आणि विशाल गंगावणे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. त्यांच्यावर पीटा आणि इतर कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत. कुंटनखाना चालवणाऱ्या नानी गंगावणेलाही स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलंय.

LATEST VIDEOS

LiveTV