नाशिक : महिला चोरांच्या टोळीचा धुमाकूळ

04 Dec 2017 09:30 PM

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून महिला चोरांच्या टोळीने चांगलाच धुमाकुळ घातलाय. काही दिवसांपूर्वी नाशिकरोड परिसरातील एका औषधांच्या दुकानातून 6 ते 7 महिलांच्या टोळीने दीड लाख रुपये रोख चोरी केले होते नाशिकरोड पोलिस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल झाला होता आणि ही घटना ताजी असतांनाच कॅनडा कॉर्नर परिसरातील पोहमल या आर्टिफिशियल ज्वेलरी शॉप मधून शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास एका लहान बाळासह आलेल्या तिन बुरखाधारी महिलांनी दागिने बघण्याचा बहाणा करत सोन्याची चैन, मंगळसूत्र, राणीहार, नेकलेस असे एकूण दीड लाख रूपयांचे दागिने चोरी केले आणि पलायन केलं. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून सरकारवाड़ा पोलिस स्टेशनला याबाबत गुन्हा दाखल झाला आहे, सध्या पोलिस या महिलांचा शोध घेत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV