नाशिक : पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा नाशिककरांच्या वतीनं नागरी सन्मान

20 Nov 2017 03:45 PM


पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांचा नाशिककरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. पंडीत मंगेशकरांनी काल ८१ व्या वर्षात पदार्पण केलं. यावेळी नाशिकबद्दलच्या आपल्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विशाखा सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंडीत शंकरराव वैरागकर यांच्या हस्ते पंडीत ह्दयनाथ मंगेशकरांचा सत्कार करण्यात आला. नाशिकच्या भद्रकालीतील मधू झेंडेंच्या घरची भाकरी आणि तिखट खात काढलेले दिवस ते कुसुमाग्रज आणि लतादिदींची भेट आदी विषयांवर मंगेशकरांनी मसमोकळ्या गप्पा मारल्या

LATEST VIDEOS

LiveTV