नाशिक : अवकाळी पावसाचा फटका; द्राक्ष, मका, बाजरीचं नुकसान

22 Nov 2017 12:18 PM

नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागांना काल संध्याकाळी जोरदार अवकाळी पावसाचा फटका बसला. यात कांदा, द्राक्ष, शेवगा या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर काढून ठेवलेली बाजरी, मका सुद्धा ओला झालाय. काल संध्याकाळी पिंपळगाव, चांदवड, मालेगाव, नागपूर, अंबासन या भागात पावसाचा जोर अधिक होता. तर इतर भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. आधीच दोन दिवस ढगाळ वातावरण होतं, त्यात पाऊसदेखील झाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV