नाशिक : नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ सुरुच, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू

07 Dec 2017 12:27 PM

जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा धुडगूस अजूनही सुरुच आहे. बिबट्याच्या हल्ल्यात काल सात वर्षाच्या कुणाल प्रकाश अहिरे या बालकाचा मृत्यू झाला. रात्री 9.30च्या सुमारास ही घटना घडली. दुसरीकडे उपखेड येथे बिबट्याने दुपारी केलेल्या हल्ल्यात एक महिला जखमी झाली. एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे सर्वांचा थरकाप उडाला आहे. आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्यानंतरही  बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेलं नाही. 

LATEST VIDEOS

LiveTV