नाशिककरांनी अनुभवला मोटोक्रॉसचा थरार, 70 स्पर्धकांचे थरारक स्टंट्स

05 Nov 2017 10:18 PM

नाशिककरांनी आज मोटोक्रॉस स्पर्धेचा थरार अनुभवला. एमआरएफ सुपर क्रॉस रॅलीच्या निमित्तानं आज देशापरदेशातले 70 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. गोदा पार्कजवळच्या सुयोजित व्हॅलीमध्ये सकाळी 10 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. 650 मीटर लांबीच्या ट्रॅकवर 9 वेळा दुहेरी उडी घेता येईल अशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे हवेत गाड्या उडवण्याची धमाल स्पर्धकांनाही अनूभवता आली आणि प्रेक्षकांनाही.
नटराज, के. तन्वीर, हरीश नोव्हा, दुबईचा बाईकर जीनन या स्पर्धकांनी नाशिककरांची मने जिंकली.

LATEST VIDEOS

LiveTV