नाशिक: नाशिक-मुंबई विमान सेवा लवकरच,नशिबवंताला 1 रुपयात प्रवासाची संधी

13 Dec 2017 11:45 AM

नाशिककरांसाठी आनंदाची बातमी... पंतप्रधान मोदींनी घोषणा केलेल्या उड्डाण योजनेंतर्गत सुरु झालेल्या विमानसेवेची उद्यापासून तिकीटविक्री सुरु होणार आहे. पुढच्या १० दिवसात म्हणजे २३ डिसेंबरपासून
नाशिक ते मुंबई विमान सेवा सुरु होईल, विशेष म्हणजे काही नशीबवान प्रवाश्यांना या विमानानं फक्त 1 रुपयात प्रवासाची संधी मिळणार आहे.. एअर डेक्कनच्या 19 सीटर विमानानं ही सेवा सुरु होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकहून हवाई वाहतुकीसंदर्भात फक्त घोषणाच होती मात्र, आता लवकरच नाशिककर हवाई वाहतुकीचा अनुभव घेऊ शकणार आहेत...

LiveTV