नाशिक : मुंबई-नाशिक विमानसेवा अजूनही 'हवेतच'

21 Dec 2017 08:51 PM

मुंबई-नाशिक उडान विमानसेवा सुरू नक्की कधी सुरु होणार असा प्रश्न निर्माण झालाय... 23 डिसेंबरला सकाळी नाशिकहून मुंबईला पहिलं उड्डाण होणार होतं..  पालकमंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते उद्घाटन सोहळा झाल्यानंतर विमान सेवा सुरू होईल अशी माहिती नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीए...तर तिकडे एअर डेक्कनकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आल्याचं खासदार हेमंत गोडसेंनी म्हंटलंय..या श्रेयवादाच्या गोंधळात प्रवाशांची मात्र गोची झालीए... पहिलं उड्डाणं नेमकं केव्हा होणार याबाबत प्रवाशांसह सर्वच जण संभ्रमात आहेत. दरम्यान, याबाबत एच.ए.एल आणि डेक्कन कंपनीकडून  कुठलीच अधिकृत माहिती दिली जात नाहीये..

LiveTV