नाशिक : अनकाईमध्ये शेतकऱ्यांच्या काद्यांवर चोरट्यांचा डल्ला

16 Dec 2017 09:06 PM

गेल्या काही दिवसांपासून चांगले दर मिळत असलेल्या शेतकऱ्यांच्या कांदाकडे चोरट्यांनी आपली नजर वळवली. नाशिक जिल्ह्यातल्या अनकाईमधील एका शेतक-याच्या शेतातून १४ क्विंटल कांदा चोरट्यांनी लंपास केला. सध्याच्या बाजारभावाप्रमाणं या कांद्याची साधारण किंमत ४० ते ४५ हजार रुपये इतकी आहे. धर्मा डामले यांची मनमाड-येवला या मार्गालगत असलेल्या आपल्या शेतात लाल कांद्याची लागवडी केली होती. तयार झालेला कांदा त्यांनी शेतात काढून ठेवला होता. मात्र गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी या १४ क्विंटल कांद्यावर डल्ला मारला. विशेष म्हणजे धर्मा डामले हे होमगार्ड पथकात सेवाही देता आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV