नाशिक : रुममेट्सच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या, चार रुममेट्सवर गुन्हा दाखल

23 Dec 2017 12:00 AM

रुममेट्सच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. शुभम पाटील असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो बीएससी अॅग्रीच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता.

20 वर्षीय शुभम पाटील या विद्यार्थ्याने आडगाव परिसरातील भाड्याने घेतलेल्या घरात दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट आढळली होती. रुममेट्स माझ्या इच्छेविरुद्ध माझ्याकडून काम करुन घेत असल्याचा उल्लेख नोटमध्ये केला होता.

LATEST VIDEOS

LiveTV